“एन.आय.ए.’चा राजकीय वापर निषेधार्ह : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भाजपावर टीका
“एन.आय.ए.’चा राजकीय वापर निषेधार्ह : भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भाजपावर टीका
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सरकार भीमा-कोरेगाव प्रकरणाची चौकशी करण्याची शक्यता वाटल्याबरोबर तातडीने केंद्रातील भाजपा सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एन.आय.ए.) देण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. भाजपा सरकारच्या या कृतीची गंभीर दखत घेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाने हा कृतीचा निषेध आणि राष्ट्रीय तपास संस्थेचा राजकीय वापर निषेधार्ह असल्याचे मत प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या असत्य व चुकीच्या गोष्टी लपविण्यासाठीच ही खेळी खेळली गेली असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक तत्कालीन ‘एन.आय.ए.’ने पुणे पोलिसांना क्लीन चिट दिली होती आणि चौकशी सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा आदेश त्वरित मागे घ्यावा आणि राज्य सरकारला न्याय देण्यासाठी या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करावे, अशी मागणी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाने केली आहे.