
‘‘NRC / CAA ला विरोध का?’’ पुस्तिकेचे नाशिक येथे प्रकाशन
‘‘NRC / CAA ला विरोध का?’’ पुस्तिकेचे नाशिक येथे प्रकाशन
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या प्राचार्य कॉ. आनंद मेणसे लिखित ‘‘NRC / CAA ला विरोध का?’’ या पुस्तिकेचे प्रकाशन नाशिक येथे करण्यात आले. नाशिक येथे संविधानप्रेमी नाशिककर या मंचाच्यावतीने CCA/ NRC विरोधी धिक्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी समशेर खान, सादिया शेख, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले, साप्ताहिक युगांतरचे संपादक मंडळ सदस्य कॉ. महादेव खुडे, किरण मोहिते, नितीन मते, आसिफ शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.