‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी सावधानता बाळगावी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे निवेदन
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जनजीवन विस्कळित झाले असून, याचा सामना करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित येऊन ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिवालायाने केले आहे. देशात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे व प्रशासन करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
या संकटाच्या स्थितीत सर्वत्रच बंदची स्थिती असल्याने कामगार, विक्रेते, रिक्षाचालक, टॅक्सी ड्रायव्हर, फेरीवाले तसे हातावरचे पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांना रोजीरोटी मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा घटकांना सरकारने आर्थिक भत्ता व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून दिलासा देण्याची गरज आहे. तसेच गरीब लोकांना मास्क व सॅनिटायझरच मोफत पुरवठा करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरकारकडे करत आहे. दरम्यान, कौरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटनेना व प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केले आहे.