ब्रह्मपुरी (चंद्रपूर)चे भाकपचे उमेदवार कॉम्रेड विनोद झोडगे यांना वाढता पाठिंबा…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रपुर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या प्रचारार्थ सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला.
4 आक्टोंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय सर्वानुमते यावेळी घेण्यात आला. यावेळी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते, मित्र परिवार व मान्यवर मंडळींनी मोठ्या संख्येने ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.