भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन
देशात दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत चाललेल आहेत. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील १० आदिवासींना वनविभागाच्या जमिनीवरून हुसकावून लावण्याकरिता स्थानिक गावप्रमुखांच्या गुंडांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना नुकतीच घडलेली आहे. उन्नाव येथील महिला अत्याचारामुळे भाजपचा गुन्हेगारी चेहरा स्पष्ट झाला आहे. झुंडशाहीने अल्पसंख्यांक, दलित यांनाच लक्ष केले आहे. याविरुद्ध पक्षाच्यावतीने या आंदोलनाची हाक दिलेली आहे. या आंदोलनाअंतर्गत पक्षाच्यावतीने जिल्ह्याजिल्हयांत ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये धरणे, निदर्शने, सभा अशाप्रकारे आंदोलन केले जाणार आहे.