नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे यांचा भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
नाशिक शहरात सामाजिक ,परिवर्तनवादी चळवळीत गेली 20 वर्ष कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते पद्माकर इंगळे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात जाहीर प्रवेश केला. पद्माकर इंगळे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात, राष्ट्रीय एकात्मता चळवळीत सक्रिय आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर त्यांनी नाशिकमध्ये आम आदमी पक्ष स्थापनेतही सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर मात्र गेली 2 वर्षे ते फक्त सामाजिक कार्यात सक्रिय होते.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सर्वव्यापी भूमिका तसेच कॉ. डॉ. कन्हैयाकुमारसारखा युवा नेता, कॉ. डी. राजा, कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, कॉ. अमरजित कौर, कॉ. अतुलकुमार अंजान यांच्यासारखे राष्ट्रीय नेते तसेच मुंबईचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांचे नेतृत्व व नाशिक शहरात भाकप, आयटक, किसान सभा तसेच प्रबोधनाच्या चळवळीत झोकून देऊन काम करणारे कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड महादेव खुडे यांच्या सोबत चळवळीत काम करण्यात आनंद होईल, या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पक्षघटना, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ग्रंथसंपदा, पक्षाचे मुखपत्र साप्ताहिक युगांतर याची प्रत देऊन त्यांच पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड राजू देसले, नाशिक शहर सचिव कॉम्रेड महादेव खुडे, कॉम्रेड शिवनाथ जाधव, कॉम्रेड गवारे, कॉम्रेड नितीन शिराळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.