skip to Main Content
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

सिल्लोड येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शहरातील कॉम्रेड अण्णा भाऊ साठे चौक येथील लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नामफलकाला पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

तत्पूर्वी पक्ष कार्यालयात अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे तालुका सचिव कॉ. बाबुराव पठाडे होते. यावेळी कॉ. सय्यद अनिस यांनी कॉ. साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत म्हणाले, की अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यातून लोकप्रबोधन केले व स्वातंत्र्य चळवळीला आपल्या गीत, पोवाडे यांच्यामाध्यमातून लोकांमध्ये देशभावना जागृत केली.

यावेळी कॉ. बाबुराव पठाडे, कॉ. शेख इशाक, कॉ. शेख बाबु, कॉ. सय्यद अनिस, कॉ. हमिद खान पठाण, कॉ. शेख अमान, कॉ. अशोक गायकवाड, कॉ. जाबेर पठाण, सय्यद परवेझ, चेतन गायकवाड, शेख तौहित, शरीफ पठाण, शेख बशीर, विशाल मगरे,  सत्तार शेख, फय्याज शेख, इसाक शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *