मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेते, खंडकरी शेतकऱ्यांना न्याय…
मुंबई : मुंब्रा येथे राहणारे प्रवासी कामगार रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकाळत बसले आहेत. त्यांना मुंब्रा पोलिस…
भारतीय कम्युनिस्ट पक्ष पर्यायी कार्यक्रम सुचवत आहे, जो डाव्या लोकशाही आघाडीच्या माध्यमातून दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता आणि रोगराई असे मूलभूत प्रश्न हाताळेल. याचा अर्थ सध्या फक्त किमान कार्यक्रम अंमलात आणायचा नाही तर त्यापलीकडे जाऊन आणखी प्रगतीकारण धोरणे व कार्ये हाती घ्यायची आहेत. फक्त कामगार, शेतकरी, शेतमजूर, इंजिनिअर्स आणि तंत्रज्ञ, युवक आणि विद्यार्थी, महिला, शिक्षक आणि व्यावसायिक जनसमूह या संघटनांच्या जनआंदोलनातून हे वळण घेणे शक्य आहे. हे संघर्ष वैचारिक-राजकीय मोहिमेच्या मार्गाने राजकीय स्तरावर उंचावले पाहिजेत. वर्गीय शक्ती संतुलनात बदल घडविण्याचे उद्दिष्ट ठेऊन बदलाचे व परिवर्तनाचे हे रणमैदान असेल. श्रमजीवी जनतेची मोहिम, चळवळ व संघर्ष ही पर्यायी मार्ग पुढे नेण्याची गुरूकिल्ली आहे.